Livve Dinmaan Online
हातकणंगले - शिरोली औद्योगिक वसाहतीतील मिळकतींच्या घरफाळा वसुलीचे हक्क पूर्ववत ग्रामपंचायतीला द्यावे अशा मागणीचे निवेदन शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

राज्यातील मागील युती शासनाने कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला ऐवजी नागरी विकास प्राधिकरण करून त्यामध्ये शहरालगतची काही गावे समाविष्ट केली आहेत. त्यामध्ये शिरोली पुलाची गावचा समावेश आहे. पण याच गावच्या हद्दीत असलेल्या शिरोली औद्योगिक वसाहतींला मात्र प्राधिकरणातूनही वगळले आहे. येथील उद्योजकांची स्वतंत्र इंडस्ट्रियल टाउनशिप ची मागणी आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून तत्कालीन सरकारने शिरोली औद्योगिक वसाहतीला प्राधिकरणातून वगळले.तसेच येथील घरफाळा वसुलीचे शिरोली ग्रामपंचायतीचे हक्क काढून घेऊन ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात दिले.त्यामुळे शिरोली ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी झाले म्हणून शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. औद्योगिक विकास महामंडळाला घरफळा वस्तूचे वसुलीचे दिलेले आदेश रद्द करून पूर्ववत ते अधिकार ग्रामपंचायतीला देऊन देण्याबाबत आदेश काढावेत असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, हातकणंगलेचे आमदार राजूबाबा आवळे, ग्राम विकास अधिकारी ए. एस. कटारे, उपसरपंच सुरेश यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, विठ्ठल पाटील, बाजीराव सातपुते, विजय पोवार, सरदार मुल्ला, उत्तम पाटील, राजेंद्र सुतार,मुनेर सनदे, सतीश रेडेकर उपस्थित होते.
Comment: