Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

प्रतीक्षा संपली!! आता ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ !!

विविध बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन


Posted on :3/14/2026 11:04:07 PM


Livedinmaan.com
Kolhapur
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आपल्या यशस्वी वाटचालीची ६३ वर्षे पूर्ण करीत आहे. या सुदिनाचे औचित्य साधून संघामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन 15 मार्च रोजी गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले आहे. यामध्ये विविध फ्लेवर्समधील प्रिमियम क्वालिटीच्या ‘गोकुळ आईस्क्रीम’चा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच सन २०२४–२५ या वर्षातील ‘गोकुळ श्री’ पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा ही आयोजित करण्यात आला आहे.  जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्तरावर गाय व म्हैस यांचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, म्हशीचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे उत्पादक, म्हशीचे उत्तम प्रतीचे दूध पुरवठा करणारे उत्पादक तसेच गाय- म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या महिला दूध संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. 

याशिवाय कोल्हापूर, पुणे व मुंबई येथे जास्तीत जास्त दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दूध वितरकांचाही सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. या सर्वांचा समावेश असलेला बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडणार असून, गोकुळ दूध संघाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या दूध उत्पादक व वितरकांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे संघाकडून सांगण्यात आले. 

दैनंदीन दूध विकी बरोबरच सध्या गोकुळ टेट्रापॅक मधील दूध, पनीर, चीज, गुलाब जामून, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क, बासुंदी, पेढा इत्यादी दुग्धजन्य पदार्थ विक्री करत असून गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणांत बाजारातून मागणी होत आहे. गेल्या काही वर्षापासून गोकुळच्या वितरक वा ग्राहकांकडून ‘गोकुळचे आईस्क्रीम’ मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारची मागणी केली जात होती. त्याप्रमाणे गोकुळच्या तज्ञ अधिका-यांच्या देखरेखीखाली आईस्क्रीम तयार करून घेतले आहे. सदरच्या आईस्क्रीममध्ये म्हैस दूध, स्किम मिल्क पावडर, म्हैस लोणी व गाय किस व नॅचरल फ्लेवर वापरण्यात आले आहेत. गोकुळचे आईस्क्रीम हे कप पॅकींग, कोन पॅकींग, फॅमिली पॅक या व्हेरीयंटमध्ये उपलब्ध असून मँगो, नॅचरल व्हेनीला, बेल्जीयन चॉकलेट, बटर स्कॉच, हॅअलनट कन्च, बिसकोटी बिस्कॉफ व अफगाण ड्रायफ्रूट, राजभोग या फ्लेव्हर मध्ये उपलब्ध आहेत.संघाचे फुलक्रीम व गाय दूधास ज्या प्रकारे मुंबई व पूणे येथे चांगली मागणी आहे. त्याप्रमाणेच गोकुळच्या आईस्क्रीमला देखील मुंबई व पूणे मार्केटमधून चांगला प्रतिसाद मिळेल याचा विश्वास यावेळी संचालक मंडळाने व्यक्त केला. 

गुढी पाडवा, रमजान ईद सणाच्या काळांत तसेच सध्या उन्हाळ्याचा सिझन असलेने गोकुळच्या ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्था बरोबरच गोकुळच्या आईस्क्रीमचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ व सार्वजनिक आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील , आमदार विनय कोरे , आमदार चंद्रदीप नरके यांच्या तसेच जिल्ह्यातील आमदार व मान्यवर व चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक मंडळ यांच्या उपस्थित राहणार आहेत.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.