Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ डिसेंबरपासून


Posted on :12/2/2021 11:02:00 AM


Live Dinmaan Online
Kolhapur
सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज” अशी संकल्पना घेऊन यंदाचा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. १४ ते १७ डिसेंबर असे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ७० माहितीपट दाखविण्यात येणार आहेत. ऑनलाइन सादरीकरणाद्वारे हा महोत्सव जगभरातील रसिकांपर्यंत पोचविण्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

किर्लोस्कर उद्योग समूहाने आजवर सहा राज्यांतील तीस शहरात अडीचशेहून अधिक महोत्सव आयोजित केले आहेत. कोरोना काळानंतर जनजीवन पूर्ववत होत आहे. कोरोना समस्येचे संधीत रूपांतर करण्याचा भाग म्हणून यंदा १५ वा महोत्सव “सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज” या घटकांशी निगडित विषयावर होणार आहे.

 नव्या आजारांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण करणे, जीवसृष्टी धारण करण्याची वसुंधरेची क्षमता वाढविणे आणि पुढील पिढ्यांसाठी आरोग्यपूर्ण पर्यावरण राखणे यासाठी शाश्वत उपाययोजनांचा शोध घेणे हा उद्देश घेऊन महोत्सव साजरा होत आहे.
     
यंदाच्या ऑनलाईन महोत्सवात उद्घाटन समारंभ, तज्ञांचे मार्गदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, वसुंधरा सन्मान, कार्यशाळा, चर्चासत्र, निसर्गसंवाद, चित्रपट, दृकश्राव्य व्याख्याने असे कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवात सहभाग घेण्यासाठी https://bit.ly/kviff2021 या लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.