Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

यशवंत सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ.प्रतिक्षा पांडुरंग माने (कडवे) तर व्हा-चेअरमनपदी सदाशिव विष्णू पाटील (साळशी) यांची एकमताने बिनविरोध निवड ..


Posted on :7/18/2020 10:07:03 PM


Livve Dinmaan Online

शाहूवाडी - सरूड (ता. शाहूवाडी) येथील शाहूवाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची यशवंत सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ. प्रतिक्षा पांडुरंग माने (कडवे) तर व्हाईस-चेअरमनपदी सदाशिव विष्णू पाटील (साळशी) यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या माजी चेअरमन सौ. रागिणी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन पदाधिकारी निवडी पार पडल्या.                                                                      
प्रारंभी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शाहूवाडी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. पदाधिकारी निवडीनंतर नूतन चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन चेअरमन सौ. माने यांनी सर्व सहकारी संचालकांना सोबत घेऊन सभासदाभिमुख काराभरातून संस्थेचा लौकिक वृद्धिंगत करण्याचा विश्वास व्यक्त केला.

संस्थेचे संचालक हेमंत भालेकर, संपतराव पाटील, रतनसिंग राठोड, विक्रम पोतदार यांचेही मनोगत झाले. तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष सदाशिव कांबळे यांनी आभार मानले.

याप्रसंगी संचालक चंद्रकांत पाटील, बाबुराव शिंदे, शामराव बनसोडे, संजय थोरात, नामदेव पाटील, किरण शिंदे, काकासाहेब सरोदे, सल्लागार सुरेश यादव, लक्ष्मण जंगम, बंडोबा घोळवे, एस.के.पाटील, संजय जगताप, बाजीराव पाटील, सर्जेराव काळे, उमेश कुंभार तसेच सभासद व कर्मचारी उपस्थित होते.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.