Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

कोल्हापूर मर्कजचे प्रमुख हाजी दिलावर मुल्लाणी यांचे निधन.


Posted on :3/8/2026 5:38:28 PM


Livedinmaan.com
कोल्हापूर /
कोल्हापूर मर्कज (तब्लिग जमात)चे प्रमुख धर्मगुरू हाजी दिलावर मकबूल मुल्लाणी (रा.बालिंगे ता.करवीर) यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या आजाराने वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले.

गेली 15 वर्षे कोल्हापूर मर्कजचे प्रमुख धर्मगुरू म्हणून ते कार्यरत होते, त्यामुळे त्यांचा कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यात मोठा संपर्क होता.मुस्लीम समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते, प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याच्या व समाजातील उदभवणाऱ्या प्रत्येक प्रश्नांच्या सोडवणूकीत त्यांची प्रमुख भूमिका असे. निहाल पैलवान मस्जिद अर्थात कोल्हापूर जिल्हा मर्कजचे केंद्र .या ठिकाणी दररोज ते आपल्या सहकाऱ्यांसोबत बैठकीत असायचे.आपली प्रकृती स्थिर नसताना देखील जिल्ह्यात दौरा करून मुस्लिम समाजातील प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचा पुढाकार होता..

मुस्लिम समाजाचे धर्मगुरू म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश , उत्तर प्रदेश दिल्ली,या ठिकाणी त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा होता.रविवारी रात्री त्यांच्यावर बागलचौक येथील कब्रस्तान मध्ये दफनविधी करण्यात येणार आहे.यावेळी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील  तब्लिग जमातीचे अनुयायी हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत.रमजान महिन्यात त्यांचे निधन झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे..



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.