Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

शिरोली येथे विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू


Posted on :8/2/2020 5:28:25 PM


Livve Dinmaan Online
शिरोली (प्रतिनिधी ): शिरोली पुलाची येथील  कामत कॉलनी भागात घराच्या गच्चीवर मित्रांसमवेत खेळत असताना हातातील लोखंडी सळई चा घराजवळील विजेच्या खांबावरील तारेला स्पर्श झाल्याने यश पुंडलिक बिरजे वय 13 या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी यश बिरजे हा आपल्या आई-वडिलांसोबत शिरोली येथील यादववाडी भागात भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या वडिलांनी याच परिसरात कामत कॉलनीत  नवीन घर बांधले आहे. या घराच्या गच्चीवर तो आज मित्रांसमवेत खेळत होता. त्याच्या हातात लोखंडी सळई होती. ही सळई  अचानक घराजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील तारेला स्पर्श झाली आणि यशला विजेचा जोरदार धक्का बसला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. 

यशच्या  वडिलांनी नवीन बांधलेल्या घराची वास्तुशांती 6 ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. त्यापूर्वीच यशवर काळाने  झडप घातली. यश हा येथील कौतुक विद्यालयात सातव्या इयत्तेत शिकत होता. या घटनेची शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे अधिक तपास सपोनि किरण भोसले करीत आहेत



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.