Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

इंदिरा गांधी सूतगिरणीच्या अध्यक्ष इंदुमती आवाडे यांचे निधन


Posted on :7/25/2020 3:04:44 PM


Livve Dinmaan Online
इचलकरंजी प्रतिनिधी - इचलकरंजीतील इंदिरा गांधी  महिला सहकारी सूतगिरणीच्या संस्थापक अध्यक्ष आणि आ.प्रकाश आवाडे यांच्या मातोश्री इंदुमती कल्लाप्पांण्णा  आवाडे यांचे आज दुपारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. 

इचलकरंजीचे माजी खासदार,  माजी उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या त्या पत्नी होत. कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील भोज हे  त्यांचे माहेर.आवाडे  घराण्यात  सून म्हणून आल्यानंतर त्यांनी आपल्या कष्टाळू आणि संस्कारी स्वभावामुळे  कल्लाप्पाणा आवाडे यांच्या राजकीय,सामाजिक,  सहकार,  क्षेत्रातील वाटचालीत त्यांनी  मोलाचे सहकार्य केले. इचलकरंजीत  त्यांनी देशातील पहिली महिला सूतगिरणी स्थापन केली.या इंदिरा गांधी  महिला सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्ष होत्या. 

इचलकरंजीतील इंदू-कला या  निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.शहरातून अंत्ययात्रा काढून सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.