Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

हर्ष ऑप्टिशियनचे मालक हेमंत हरिश्चंद्र नाईक दुखंडे यांचे निधन


Posted on :8/27/2020 3:17:53 PM


Livve Dinmaan Online 
कोल्हापूर - येथील राजारामपुरी येथील हर्ष ऑप्टिशियनचे मालक व कोकण मित्र मंडळाचे सल्लागार हेमंत हरिश्चंद्र नाईक-दुखंडे यांचे आज मध्यरात्री निधन झाले. कोकण मित्र मंडळाचे अध्यक्ष वसंत दुखंडे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

गेल्या दोन तीन दिवसांपासून हेमंत हरिश्चंद्र नाईक-दुखंडे आजारी होते.त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांच्या रक्तातील ऑक्सिजन मात्रा कमी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे कळते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील दुखंडे कुटुंबीय गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूर येथे वास्तव्यास आहे.आपल्या सचोटी आणि विश्वासाच्या जोरावर या कुटुंबीयांनी हर्ष ऑप्टिशियन या आपल्या चष्मे बनवण्याच्या अत्याधुनिक व्यावसाला कोल्हापुरात भरभराटीला आणले.व कोल्हापुरातच आपल्या चार ते पाच शाखा सुरू केल्या.हेमंत दुखंडे हे राजारामपुरी येथील शाखा सांभाळत होते.अतिशय लाघवी स्वभाव आणि मितभाषी हेमंत दुखंडे यांच्या निधनामुळे त्यांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला धक्का बसला आहे.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.