Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांचे हैदराबाद येथे निधन


Posted on :12/2/2021 8:15:03 AM


Livedinmaan online
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांचे हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याच्या धक्कादायक बातमीने सोशल मीडियावर आज गुरुवारी सकाळी हळहळ व्यक्त करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून आमदार जाधव यांच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती.मात्र ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

उद्योजक आणि नामांकित फुटबॉलपटू असलेल्या 
आमदार जाधव यांनी आपल्या राजकिय कारकिर्दीत अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती.कोल्हापूरच्या उद्योग व्यवसायात वृद्धी करून उद्योजकांना सुविधा निर्माण करून देण्याबरोबरच कोल्हापूर शहरातील आवश्यक सुविधा आणि विकासकामांना कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न देता गती देण्यासाठी ते कार्यरत होते.

त्यांचे पार्थिव हैदराबाद येथून दुपारपर्यंत कोल्हापूर येथे आणले जाणार आहे असे निकटवर्तीयांनी कळविले आहे .



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.