Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

कोरोना इफेक्ट " कच्चे- पक्के लायसन्स वगळता आरटीओचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू -डॉ. स्टीव्हन अल्वारिस


Posted on :6/1/2020 11:11:52 PM


Livve Dinmaan Online
कोल्हापूर -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कच्चे लायसन्स व पक्के लायसन्स वगळता इतर कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.

आरटीओ कार्यालयात कच्चे लायसन्स व पक्के लायसन्स वगळता इतर कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले असून नवीन वाहन नोंदणी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. आता वाहन योग्यता प्रमाणपत्र,वाहन हस्तांतरण, बोजा उतरवणे, वाहन ना हरकत प्रमाणपत्र, दुय्यम लायसन्स पत्ता बदलणे इत्यादी बाबीही सुरू करण्यात आल्या आहेत. योग्यता प्रमाणपत्रासाठी ऑटो रिक्षा 18, डिलिवरी व्हॅन 10, हेवी व्हेइकल्स 30, लाईट गुड्स 10, टुरिस्ट 2 असा कोटा ठरविण्यात आला आहे. डुप्लिकेट लायसन व इतर कामकाज 100 कोटा आहे. यामध्ये शिकाऊ लायसन्स व पक्के लायसन्स बंद आहे. वाहन हस्तांतरण, बोजा उतरवणे, ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी बाबींसाठी 100 असा कोटा निश्चित करण्यात आला आहे.कार्यालयाचे कामकाज ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार होणार आहे.वाहनासंबंधी ऑनलाइन अपॉइंटमेंट www.parivahan.gov.in/vahan 
व अनुज्ञप्तीसाठी 
www.parivahan.gov.in/sarathi
या लिंक वर घ्यावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयात  काळजी घेण्याबाबत फलक लावण्यात आले असून कार्यालयात प्रवेशासाठी फक्त एकच प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले आहे.कार्यालयातील पार्किंगचा वापर सद्यस्थितीत बाहेरील व्यक्तीस करता येणार नाही. प्रवेश करताना स्वयंचलित हॅन्ड सॅनिटायझरने हात धुऊन, मास्क परिधान करून, प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्याकडून थर्मल स्कॅनिंग करून घेवूनच प्रवेश करावा. सामाजिक अंतर पाळावे, गर्दी करू नये, अन्यथा, कामकाज बंद करावे लागेल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी स्पष्ट केले.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.