Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

शेंडा पार्क येथील झाडांना नवसंजीवनी देणार : आ.ऋतुराज पाटील


Posted on :12/30/2020 11:00:37 AM



आमदार ऋतुराज पाटील यांनी शेंडा पार्क परिसरातील आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची पाहणी केली.यावेळी पाचगाव सरपंच संग्राम पाटील, मोरेवाडी सरपंच दत्तात्रय भिलुगडे आणि  शासकीय अधिकारी उपस्थित होते.
Livve Dinmaan Online
कोल्हापूर - शेंडा पार्कपरिसरातील आगीची झळ पोचलेल्या  झाडांना नवसंजीवनी  देण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डी वाय पाटील ग्रुपकडून दरोराज पंधरा टँकरद्वारे पाणी झाडांना देण्याचे  नियोजन केल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.  या झाडांच्या संवर्धनासाठी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून  तात्काळ निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही  आ. पाटील यांनी दिली.तसेच विविध स्वयंसेवी संस्था आणि युवकांच्या सहभागातून या झाडांचे मल्चिंग करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.




शेंडा पार्क येथे आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकारी, पाचगाव , मोरेवाडी ग्रामपंचायत  पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी  संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. 




आमदार पाटील यांनी शेंडापार्क येथील आगीमुळे नुकसान झालेल्या परिसराची तासभर पाहणी केली. 
या आगीची  सुमारे २५ हजार झाडांना   झळ पोचली असून  यातील  लहान आकाराची सुमारे तीन हजार झाडे पूर्णपणे जळाली आहेत , उर्वरित झाडांना जर पाणी दिले तर ती झाडे जगातील अशी माहिती उपस्थित अधिकारी यांनी दिली. यावर  डी.वाय.पाटील ग्रुपतर्फे दररोज 15 टँकर देऊ, तसेच मोरेवाडी, पाचगाव ग्रामपंचायत सुद्धा यासाठी सहकार्य करेल.कोल्हापूरातील स्वयंसेवी संस्थानासुद्धा यासाठी विनंती करणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. 




जी 3 हजार झाडे जळाली आहेत, ती झाडे सामाजिक वनीकरण विभागाने पुन्हा नव्याने लावावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.हा भाग नागरी वस्तीच्या जवळ आहे त्यामुळे कचरा जाळल्याने हा प्रकार घडला असून या संपूर्ण जमिनी भोवती कुंपण घालणे गरजेचे असल्याचे वृक्षाप्रेमींनी सांगितले . कोरोनामुळे मिळणारा निधी मिळाला नसल्याने काम करताना अडचणी येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी  नमूद केले.यावर वनमंत्री यांच्याशी संपर्क करून निधीचा प्रश्न मार्गी लावू असे आ.पाटील यांनी सांगितले.


ही झाडे जगविण्यासाठी आ.पाटील यांनी पुढाकार घेतल्याने ही झाडे जगविण्यासाठी पाठबळ मिळेल, असे वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुडडे यांनी सांगितले. पाचगाव आणि मोरेवाडी ग्रामपंचायत लागेल ते सर्व सहकार्य करेल,अशी ग्वाही पाचगावचे सरपंच संग्राम पाटील आणि मोरेवाडी सरपंच दत्तात्रय भिलुगडे यांनी दिली.


येथील गवत जळल्याने  लिलाव घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता गवत मिळणार नाही, त्यामुळं त्यांची लिलावातील  रक्कम परत करावी,अशी मागणी नारायण गाडगीळ यांनी केली. 


यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस.आर .शिंदे,सहाय्यक वन संरक्षक  एम.बी. चंदनशिवे, उद्यान विभाग प्रमुख डॉ एस.व्ही. सावंत, करवीरचे वनपाल एस. बी. देसाई यांच्यासह पाचगाव,मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आणि  वृक्षप्रेमी उपस्थित होते.






Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.