Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

मलाबार गोल्ड अँड डायमंडस कडून कोल्हापूर जिल्हयातील १२३ विद्यार्थांनींना ११ लाख रुपयांची शिष्यवृत्ती वितरीत


Posted on :3/18/2025 4:43:25 PM


www.livedinmaan.com
Kolhapur/
कोल्हापूर कोल्हापूरातील प्रथितयश मलाबार गोल्ड अँड डायमंडसकडून CSR फंडातून सामाजिक उपक्रम म्हणून १२३ विद्यार्थानींना एकूण ११ लाख रुपयांची शिष्यवृत्ती सौ.निलिमा पाटील (मेडिकल सुपरीटेंडट) यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.

त्यावेळी डॉ. आय.सी. शेख (एम.ई. एस. कॉस वन) व सौ.निलिमा आडसूळ  (जिल्हा क्रिडा अधिकारी) उपस्थित होते.यावेळी बोलताना सौ.निलिमा पाटील म्हणाल्या, मलाबार चैरिटेबल ट्रस्टचा विद्यार्थानींना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम कौतुकास्पद,अभिनंदनीय व अनुकरणीय आहे तसेच डॉ.शेख व सौ. निलिमा आडसूळ यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मलाबार कोल्हापूर शाखेचे प्रमुख अबिद व्ही.टी.व्यवसाय वृद्धी प्रमुख सय्यद मुजावर व अन्य कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.