Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

मुस्लिम बोर्डिंगला दरवर्षी २५ लाखाचा निधी : मात्र समाजाने सुद्धा दातृत्व दाखवावे - आमदार सतेज पाटील यांनी केले आवाहन

समाजाच्या अडचणी सोडवण्याचे मुस्लिम बोर्डिंग मातृसंस्था ठरावी


Posted on :8/7/2022 6:33:37 PM


livedinmaan.com
कोल्हापूर :“मुस्लिम समाजाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. त्यामुळे मुस्लिम समाजाने देखील, मुस्लिम बोर्डिंग केंद्रस्थानी ठेवून काम करावे तसेच समाजाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्याचे मुस्लिम बोर्डिंग ही मातृसंस्था ठरावी. माझ्या आमदार फंडातून मुस्लिम बोर्डिंगसाठी वर्षाला २५ लाख रुपयांचा निधी देणार आहे. ’असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.मात्र मुस्लिम समाजाने सुद्धा आपल्या मातृ संस्थेच्या विकासासाठी दातृत्व दाखवावे असे आवाहनही करायला आ.सतेज पाटील विसरले नाहीत

दि मोहमेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग संचालित) नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  व अग्लो उर्दू हायस्कूल यांच्यावतीने आयोजित एमएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व डिजिटल क्लासरूम उदघाटन सोहळा झाला. उद्योगपती मुबारक इसाक अत्तार, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, पत्रकार गुरुबाळ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल जुबेर शब्बीर मकानदार,वहिदा असिफ मकानदार, पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल हैदर शौकत सनदे, डॉ. स्वालिया मुस्ताक मुल्ला, डॉ. तमन्ना मुनीर जमादा, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर सौरव शिवाजी खोत, खेळाडू आसमा अजमल कुरणे आदींचा सत्कार करण्यात आला. काही सत्कारमूर्तींच्यावतीने कुटुंबांतील सदस्यांनी सत्कार स्वीकारला.
 
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘मुस्लिम बोर्डिंगच्या ठिकाणी असलेल्या वस्तीगृह आणि शाळेच्या सोलर करिता आमदार जयश्री जाधव यांच्या फंडातून वीस लाख रुपयांचा निधी तर नेहरू हायस्कूलसाठी आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून दहा लाख रुपये तर माझ्या आमदार फंडातील वीस लाख रुपयांचा निधी मुस्लिम बोर्डिंगसाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नेहरू हायस्कूलसाठी वीस कम्प्युटर दिले जातील.’
श्रीमती सुगराबी हाजी बाळासाहेब अतार व आशुतोष किशोर कोराणे यांच्याहस्ते डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन झाले.

मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी स्वागत केले. प्रशासक कादर मलबारी यांनी प्रास्ताविक केले.  उपाध्यक्ष आदिल फरास यांनी संस्थेतील उपक्रमांची माहिती दिली.  कार्यक्रमाला  शालेय समिती चेअरमन रफिक मुल्ला,जहागीर आत्तार, हाजी पापाभाई कासम बागवान, रफिक शेख, हाजी लियाकत मुजावर, अल्ताफ झांजी, जहांगीर आत्तार, मलिक ईलाही बागवान, हाजी जहाँगीर हुसेन अत्तार, हाजी फारुक नूरमहंमद पटवेगार उपस्थित होते.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.