Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; आंदोलक शिक्षकांचे वेतन कपात


Posted on :12/6/2025 7:00:55 PM


livedinmaan.com

कोल्हापूर - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो शिक्षक, कर्मचाऱ्यांनी आज, ६ डिसेंबर रोजी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतेक शाळांना कुलूप लागलेले दिसून आले.

शासनाचा कठोर निर्णय:

शिक्षण उपसंचालकांनी काल (५ डिसेंबर) काढलेल्या परिपत्रकात, या आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश दिला होता. आंदोलनाच्या दिवशी हा आदेश जिल्ह्याभर गाजला. शासनाच्या या कठोर भूमिकेमुळे शिक्षक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'वेतन कपातीला आम्ही भीक घालत नाही,' असा पवित्रा घेत, शिक्षकांनी आपला मोर्चा यशस्वी करून दाखवला. टीईटी सक्ती रद्द होईपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार या वेळी आंदोलक शिक्षकांनी केला.




Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.