Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

गोकुळ दूध संघ कसा चाललाय हे विरोधकांना नाही सभासद आणि कर्मचाऱ्यांना विचारा - महादेवराव महाडीकांनी ललकारले !!


Posted on :4/24/2021 10:22:52 PM



eDaily
livvedinmaan.com
कोल्हापूर  - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे धुमशान जोरात सुरु झालंय..सत्ताधारी महाडिक आणि पीएन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारभार असणाऱ्या संचालक मंडळाला खाली खेचून गोकूळवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच राजकीय नेते एकत्र आले आहेत.आरोपांच्या फैरी झडत आहेत.त्यामूळे गेल्या काही दिवसांपासून तपशर्या करत गप्प बसलेल्या महादेवाने आता मात्र अक्षरशः विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी तांडव करायला सुरू केलंय.गोकुळ दूध संघ कसा चाललाय हे विरोधकांना नाही सभासद आणि कर्मचाऱ्यांना विचारा अशी डरकाळी फोडत महादेवराव महाडीकांनी आता विरोधकांना ललकारले आहे.!!




सोशल मीडियावर चुकीचा प्रचार करणाऱ्या विरोधकांना महादेवराव महाडिक यांनी चांगलाच इशारा दिलाय.तर दुसरीकडे महादेवाचा तिसरा नेत्र अद्याप उघडला नाही..तो उघडला तर मात्र कहर सुरू होईल असं ही त्यांचे कार्यकर्ते सांगू लागले आहेत.


टीकेचे राजकारण करून गोकूळला बदनाम करण्यासाठी एकवटलेल्या राजकिय नेतेमंडळीच्या बेताल टीकेची दखल घेण्याची बिलकुल गरज नाही हा महादेवराव महाडिक सहीसलामत आहे असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी लगावलाय.गोकुळ निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते. 


ते म्हणाले,चक्रव्युहाच्या बाहेर जायचे का नाही, हे महाडिकच ठरवणार. त्यामुळे विरोधकांनी कोणत्याही अविर्भावात राहू नये, येणारा काळ काय ते ठरवेल आणि  काळ कोणाच्या हातात नसतो.विनाकारण विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये,असे आवाहनही माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले.


गोकूळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या विरोधकांनी   सभासद आणि  कर्मचाऱ्यांना गोकुळचा कारभार कसा आहे? हे बिनधास्तपणे विचारावं, संघ आर्थिक सक्षम आहे,बाहेरून कोणाची मदत घेत नसलेला हा गोकूळ दूध संघ राज्यातील एकमेव दूध संघ आहे.कोल्हापुरात अनेक संघ आहेत आणि कित्येक बंद सुद्धा झाले. पण, गोकुळ दूध संघाला कोणीही आव्हान देऊ शकले नाही, असेही महादेवराव महाडिक यावेळी म्हणाले.




Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.