eDaily
Lived in maan.com
कोल्हापूर - माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या 30 वर्षाच्या सत्तेचा सारीपाट बदलून ‘गोकुळ’ काबीज केल्याबरोबर मंत्री सतेज पाटलांनी शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ देण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.
गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने सत्ताधारी आघाडीला 4 जागांवर रोखत 21 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवला. राज्याचे गृहराज्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी विजयानंतर पत्रकार परिषद घेऊन तात्काळ दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, हा संघ आता दूध उत्पादकांच्या मालकीचा झाला आहे.दूध उत्पादकांनी चांगलं यश मिळवून दिल्याने मनापासून डोके ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोणाच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपली असून काल कोणी काय केलं, यावरून आम्ही निवडून आलो. आता नवा अजेंडा असणार आहे, असंही त्यानी स्पष्ट केलं.
गोकुळचा दबदबा आता मुंबईत वाढवणार !!!
गोकुळचा आम्ही मुंबईत दबदबा वाढवणार असून,निवडणूक पूर्व दिलेल्या आमच्या शब्दात आम्ही कोठेही मागे पडणार नाही. प्रस्थापित व्यवस्थेमधील उणिवाही दूर केल्या जातील असे।ते म्हणाले, आम्ही मोठी धडक दिली असून संपूर्ण, जिल्ह्यातून आमचे कौतुक केले जात आहे.चार जागा आम्ही गमावल्याने पॅनल प्रमुख म्हणून दुःख आहेच, पण लोकशाही आहे. मतदार हा आपला बाप आहे. निवडणुकीत शब्द,अपशब्द वापरले गेले होते, ते व्हायला नको होते असंही ते म्हणाले
आजच्या निवडणूकीच्या निकालानंतर आमदार पी. एन.पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आली आहे.
Comment: