Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

राहुल गांधी यांनी ज्या दलित कुटुंबात स्वतः जेवण बनवून भोजन केले… त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने त्याच जेवणाचे नमुने घेतले !!


Posted on :10/9/2024 5:24:36 PM


दिनमान ऑनलाईन डेस्क
कोल्हापूर /
ज्या दलित कुटुंबात जाऊन राहुल गांधी यांनी भोजन बनवले,त्या कुटुंबातील सदस्यांसोबत ते स्वतः जेवले त्या घरातून राहुल गांधी निघून गेल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या अन्नाचे चक्क नमूने घेऊन तपासायला पाठवले.त्यांनतर दिल्ली वरून सुद्धा याबाबत पत्र पाठवून चौकशी करण्यात आल्याने अधिकारी चक्रावले आहेत.

याबाबत माहिती अशी की,पाच सप्टेंबर रोजी सकाळी विमानाने दिल्लीहून थेट कोल्हापूरला पोहचलेल्या काँगेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उचगाव येथील दलित वस्तीत जाऊन टेम्पो चालक अजय सनदे यांच्या घरात जाऊन चहापान केला, त्यांनंतर चक्क फ्रीज उघडून त्यातील भाज्या निवडल्या, आणि स्वयंपाक घरात जाऊन गॅस शेगडीवर चक्क त्या भाज्या शिजवल्या आणि त्या कुटुंबासोबत त्यांनी स्वतः भोजन सुद्धा केले.तब्बल एक तासाचा अवधी या कुटुंबातील सदस्यांसोबत घालवत त्यांच्या खानपानाबाबत सविस्तर माहिती राहुल गांधी यांनी जाणून घेतली..आणि त्यांनतर ते या घरातून बाहेर पडले.त्यासाठी नियोजित कार्यक्रम सुद्धा लांबणीवर पडला..
राहुल गांधींची ही कृती वाऱ्या सारखी कोल्हापूर जिल्ह्याबरोबर राज्यात आणि देशात सुद्धा पसरली, सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू झाली.मात्र ज्या घरात राहुल गांधी जेवले त्या घरातील जेवणाचे नमुने तात्काळ घेण्यात आल्याने हे कुटुंब सुद्धा काही अंशी चक्रावले..आणि भांबावले सुद्धा..

परंतु अधिक माहिती घेतली असता,अन्न आणि औषध प्रशासन चे सहायक आयुक्त तुषार शिंगाडे म्हणाले की राहुल गांधी यांच्या दौऱ्यामध्ये कुठेही उचगाव येथील दलित कुटुंबातील सदस्यांच्या घरात भेटीचा उल्लेख नव्हता.विमानतळ, सयाजी हॉटेल या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांच्या सोबत अन्न आणि औषध प्रशासन चे अधिकारी सुद्धा तैनात करण्यात आले होते.राहुल गांधी ज्या अजय सनदे यांच्या घरात गेले तेथे आत जाण्याला मनाई होती,त्यामूळे राहुल गांधी भोजन करून बाहेर पडल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने तेथे जाऊन राहुल गांधी यांनी बनवलेल्या भोजनाचे नमुने घेऊन ते तपासायला पाठवून दिले.त्यानंतर दिल्ली मधून सुद्धा संबंधित खात्याने पत्रव्यवहार करून याबाबत खातरजमा करून घेतल्याचे वृत्त आहे.एकंदरीत राहुल गांधींनी अचानक केलेल्या या कृतीने संपूर्ण देशातील मीडियाने त्याची दखल घेतली मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अन्नाचे नमुने घेऊन खात्याने चाणाक्ष पणा दाखवल्याने त्याची चर्चा मात्र आता सुरू झाली आहे.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.