Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

विजेच्या खांबावरून पडल्याने मृत्यू


Posted on :10/14/2024 6:03:46 PM


दिनमान ऑनलाईन डेस्क
कोल्हापूर/
करवीर तालुक्यातील आसुर्ले येथील संदिप रामराव लोहार (वय 41) यांचा रविवार (दि.13) रोजी दुपारच्या सुमारास  विजेच्या खांबावरुन पडून जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचार चालु  असताना सोमवार (दि.14) रोजी सकाळी आठच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,संदिप हा खाजगी इलेक्ट्रिकल काम करीत होता. रविवारी नागाळा पार्क येथे असलेल्या हरिपुजा अपार्टमेंट मध्ये असलेल्या विजेच्या खांबावरील बल्ब बदलत असताना अचानक पोलवरुन पडून जखमी झाल्याने त्या अपार्टमेट मधील नागरिकांनी जखमी संदिपला सीपीआर रुग्णालयात दाखल करून त्यांच्या नातेवाईकाला या घटनेची माहिती दिली.त्यांच्या पश्च्यात आई वडील, भाऊ ,पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.