Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

लग्नाची फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या प्रेमविराची उप-कारागृहात रवानगी !

आरोपीच्या आईसह, मामाही कोठडीत


Posted on :8/12/2020 11:44:03 PM


Livve Dinmaan Online 
शाहूवाडी प्रतिनिधी - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून घरातून पळवून नेल्याप्रकरणी प्रेमवीर युवकासह तिघाजणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ तसेच भा.दं.वि.सं.च्या विविध कलमान्वये शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संतोष पांडुरंग सावंत, आक्काताई पांडुरंग सावंत, राजाराम शामराव भणगे (सर्व रा. अमेणी, ता. शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. अटकेतील संशयित आरोपींना एक दिवसाच्या कोठडीनंतर पोलिसांनी मंगळवारी पुन्हा व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर केले असता न्यादंडाधिकाऱ्यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विधिग्रस्त मुलीचे वडील सुभाष दगडू पाटील (वय ३९) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपींची बुधवारी दुपारी जिल्हा उपकारागृहात रवानगी केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेणी (ता. शाहूवाडी) येथील सुभाष दगडू पाटील या फिर्यादीची सोळा वर्षीय मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती असूनही गावातीलच संतोष पांडुरंग सावंत या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सोमवारी दुपारी फिर्यादी सुभाष पाटील हे शेतात गेल्याचे पाहून संशयित संतोष या प्रेमविराने अल्पवयीन मुलीला दुचाकी (एमएच ०२ ए आर ६०६८) वरून घरातून पळवून नेले. ही घटना प्रत्यक्ष फिर्यादीच्या मुलाने पाहिली आणि वडील सुभाष पाटील यांना घडलेली हकीकत सांगितली. 
            
याबाबत फिर्यादी सुभाष पाटील हे संशयित आरोपीच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यासाठी गेले असता संतोषची आई आक्काताई पांडुरंग सावंत व मामा राजाराम शामराव भणगे यांनी अर्वाच्च शिवीगाळ करीत आपल्याला लथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सुभाष पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले, सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे या सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.