Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

बांबवडे येथे बेकायदा मद्याची चोरटी वाहतूक कारणाऱ्यास पोलिसांनी पकडले: मुद्देमालासह दुचाकी जप्त


Posted on :8/10/2020 10:34:48 PM



Livve Dinmaan Online
शाहूवाडी प्रतिनिधी: बांबवडे बसस्थानक परिसरात कोविड १९ व्यवस्थापन अंतर्गत वाहतुकीचे नियमन सुरू असताना टीव्हीएस दुचाकीवरून देशी बनावटीचा बेकायदा मद्याचा बॉक्स घेऊन चोरटी मद्य वाहतूक करणाऱ्यास शाहूवाडी पोलिसांनी रविवारी रात्री रंगेहाथ पकडले. सुरेश बाजीराव पाटील (वय वर्ष ३७, रा. गोगवे, ता. शाहूवाडी), असे या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयित आरोपीकडे दुचाकी चालविण्याचा परवाना तसेच संबंधित दुचाकीच्या विम्याची पूर्तता केली नसल्याचे आढळून आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच मोटरवाहन अधिनियम कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
          
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी संशयित सुरेश पाटील याच्याजवळ आढळून आलेले देशी बनावटीचे बेकायदा मद्य, तसेच गुन्ह्यात वापरलेली टिव्हीएस दुचाकी असा सुमारे पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून आरोपीला अटक केली. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, हे या गुन्ह्याबाबत पुढील तपास करीत आहेत.






Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.