Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

आयपीएल क्रिकेट बेटिंगवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई- मुद्देमालासह एक जण ताब्यात


Posted on :10/19/2020 5:11:50 PM



Livve Dinmaan Online
कोल्हापूर - जिल्हा पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडे यांनी मटका, जुगार  तसेच क्रिकेट बेटिंग व इतर अवैध्य व्यवसायांची माहिती काढून परिणामकारक कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व  पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
 
सध्या दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर जुगार लावला जात असून सांगली येथून एक इसम कोल्हापूर मधील तावडे हॉटेल परिसरातील तनवाणी हॉटेल व लॉजिंगमध्ये येवून क्रिकेट बेटिंग घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, तानाजी सावंत यांना मिळाली.




या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक, सत्यराज घुले. पो.हे.कॉ.संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, पो.ना.अनमोल पवार व संतोष पाटील यांचे पथक तयार करण्यात आले.या पथकाने तावडे हॉटेल परिसरातील तनवाणी हॉटेल व लॉजिंग येथे छापा टाकला असता या छाप्यामध्ये रूम नं.२०७ मध्ये संशयीत बेटिंग घेणारा इसम  उमेश नंदकुमार शिंदे,( व.व.३९, रा.आकाशवाणी केंद्राचे मागे, राधागोविंद हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर रोड, सांगली, ता.मिरज. जि.सांगली) हा आढळून  आला. या रूममध्ये टीव्ही वर कलकत्ता नाईट रायडर्स विरुध्द सनराईजर्स हैदराबाद यांचेमध्ये मॅच सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्याच अनुशंगाने हा इसम हा त्याचेकडे असलेल्या एक लॅपटॉप, चार मोबाईल हँण्डसेट, हिशोब करणे करीता दोन कॅलक्युलेटर व इतर साहित्य सामुग्रीसह सुरु असलेल्या मॅचवर बेटिंग घेत असल्याचे समोर आले. 




सांगली येथून येवून कोल्हापूर मध्ये कोणी ओळखणार नाही या उद्देशाने हा बेटिंग जुगार सुरु असल्याचे निष्पन्न झाले.या इसमाकडे अधिक चौकशी करता तो घेत असलेले क्रिकेट बेटिंग, पुढे सांगली येथीलच राहणारा इसम सनी उर्फ मिलिंद बोटे, रा.वखार भाग याच्याकडे देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानुसार शाहुपूरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.६.६६/२०२०, महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून आरोपी उमेश नंदकुमार शिंदे, व.व.३९, रा.आकाशवाणी केंद्राचे मागे, राधागोविंद हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर रोड, सांगली, ता.मिरज, जि.सांगली याला या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरच्या पथकाने अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास शाहुपूरी पोलीस ठाणे कडील सहा.पोलीस निरीक्षक, गाडे करत आहेत. सदर कारवाई मध्ये आरोपी उमेश नंदकुमार शिंदे याच्याकडून एक लॅपटॉप, चार मोबाईल हॅण्डसेट, दोन कॅलक्युलेटर, एटीएम कार्ड व इतर साहित्य सामुग्री असा एकूण ३६.६११/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या गुन्ह्यामध्ये खोलवर तपास करावेत असे आदेश दिले असून या गुन्ह्यात सामील असणा-यांवर कडक कारवाई  करण्याबाबत आणि अवैध्य धंद्यावर विशेष लक्ष केंद्रित करुन परिणामकारक कारवाई सुरू ठेवण्याबाबत सुचना दिल्या आहेत.


या गुन्ह्याच्या कारवाई मध्ये  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक तानाजी सावंत. सहा.पोलीस निरीक्षक,सत्यराज घुले, संतोष पवार तसेच पो.हे.कॉ.संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अनमोल पवार व संतोष पाटील सहभागी झाले होते.




Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.