Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

शाहूवाडी तालुक्यातील साळशी येथे भाच्याचा मामावर कुऱ्हाडीने हल्ला ; दोघेजण जखमी - सहा जणांवर गुन्हा दाखल


Posted on :8/9/2020 8:16:02 PM



Livve Dinmaan Online
शाहूवाडी प्रतिनिधी - कारागृहात बंदिस्त भावाच्या सुटकेसाठी मदत करण्यास नकार दिल्याच्या कारणातून भाच्याने आत्तेमामावर प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्याची घटना साळशी (ता.शाहूवाडी) येथे घडली. यावेळी हल्ला प्रतिहल्ल्याच्या घटनेत दोन गंभीर जखमी झाले आहेत. रामचंद्र पांडुरंग पाटील (वय ६६), कृष्णा तुकाराम मगदुम (वय ६६) अशी त्यांची नावे आहेत. शाहूवाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असून रामचंद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार राजाराम कृष्णा मगदुम, कृष्णा तुकाराम मगदुम  तर विरुद्ध फिर्यादी कृष्णा तुकाराम मगदुम यांच्या तक्रारीनुसार तानाजी आकाराम मगदुम, सर्जेराव आकाराम मगदुम, रामचंद्र पांडुरंग पाटील, सुरज सर्जेराव मगदुम आशा एकूण सहाजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही संशयिताला अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  




शाहूवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळशी (ता. शाहूवाडी) प्राणघातक हल्ला घटनेतील फिर्यादी व आरोपी हे सर्व एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. तसेच एकमेकांच्या शेजारी वास्तव्यास आहेत. संशयित आरोपी राजाराम कृष्णा मगदुम याचा भाऊ सुभाष हा एका गुन्ह्यात कोल्हापूर जिल्हा उपकारागृहात सद्या बंदिस्त आहे. त्याला जामिनावर सोडविण्यासाठी चुलत आत्तेमामा रामचंद्र पाटील मदत करीत नाही, या कारणाने चिडुन राजाराम याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने तर कृष्णा मगदुम याने काठीने हल्ला चढवला. त्याचवेळी यामध्ये डोकीत कुऱ्हाडीचा घाव लागून रामचंद्र पाटील गंभीर जखमी झाले.  बाबंबडे (ता.शाहूवाडी) येथे खाजगी दवाखान्यात जखमी मामावर उपचार सुरू आहेत. 
           
दरम्यान मेव्हण्याला मारहाण झाल्याच्या बदल्यातून तानाजी आकाराम मगदुम, सर्जेराव आकाराम मगदुम, रामचंद्र पांडुरंग पाटील, सुरज सर्जेराव मगदुम या संशयितांनी चढविलेल्या हल्ल्यात कुऱ्हाडीचा घाव चुकविण्याच्या प्रयत्नात कृष्णा तुकाराम मगदुम याच्या उजव्या हाताचा पंजा व बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र वाटणीचे गवत कापल्याच्या रागातून संशयित चौघांनी आपल्यावर कुऱ्हाड व काठीने प्राणघातक हल्ला केल्याचे जखमी कृष्णा मगदुम यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले, सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सुधीर अपराध हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.




Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.