Livedinmaan.com
कोल्हापूर - कोल्हापूरच्या जुगाड कौन्सिलिंग सेंटरने पश्चिम महाराष्ट्रात गेली दहा वर्षे समुपदेशन क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपली आहे,महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या 'ऑनलाइन ज्येष्ठांची शाळा' हा अभिनव उपक्रम जुगाडने दोन वर्षांपूर्वी कोरोना लॉकडाऊन काळात मोफत सुरू केला. या शाळेला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठमोठ्या शहरांमधून ज्येष्ठांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.त्या यशानंतर जुगाड सेंटरने ' मेमरी कॅफे हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.अशी माहिती जुगाड कौन्सिलिंग सेंटरच्या डॉ.कल्याणी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वयस्कर व्यक्तीला उतार वयात अनेक शारीरिक, मानसिक,भावनिक समस्यांना तोंड द्यावे लागते. 'मेमरी कॅफे' या उपक्रमा अंतर्गत वयस्कांना आपले शारीरिक,भावनिक, मानसिक आरोग्य कसे जपावे. त्यासाठी आवश्यक असणारा आहार ज्येष्ठांच्या भावनिक, बौद्धिक आणि शारीरिक बाबींना चालना देणारे खेळ, आर्ट, आणि क्राफ्ट, व्यायाम तसेच डिमेन्शिया,अल्झायमरची सुरुवात कशी ओळखायची यासाठी स्क्रीनिंग टेस्ट अशा अनेक गोष्टी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जुगाड सेंटरमध्ये सुरू करण्यात येणार आहेत.असे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले.
तसेच कौटुंबिक समुपदेशन ज्येष्ठ लोकांचे पालकत्व कसे करावे, ते करताना येणाऱ्या अडचणी यावर जुगाड सेंटरमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या संस्थेकडून ज्येष्ठांसाठी आवश्यक असणारे सर्व बेसिक प्रमाणपत्र कोर्सेस जुगाड मधील सर्व समुपदेशकांनी पूर्ण केले आहेत.
आपली जीवनसंध्या अधिक सुखकर होण्यासाठी कोल्हापूरमधील सर्व ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघ, हास्यक्लब, प्रतिष्ठित तालीम, मंडळे, ज्येष्ठांचे क्लब, वृद्धाश्रम सदस्य यांना मेमरी कॅफे आपल्या भागात सुरू करायचे असल्यास कृपया ७५८,मोघे प्लाझा, मुळे विहीर बस स्टॉप,शाहूपुरी,कोल्हापूर या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पत्रकार परिषदेस सुरेश खांडेकर, सौ. सुखदा आठवले, सौ.गीता हसुरकर,डॉ. शैलजा कळेकर आदी उपस्थित होते.
Comment: