Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविडयोद्धयाना लोककल्याण सेवा मंडळाच्यावतीने पीपीई किट प्रदान


Posted on :4/29/2021 12:18:28 PM



eDaily 
livedinmaan.com
कोल्हापूर - स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्धयाना कोल्हापुरातील लोक कल्याण सेवा मंडळाच्या वतीने पीपीई किट प्रदान करण्यात आले.




कोरोनाने देशभरात हाहा:कार माजवला आहे.कोल्हापुरातही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्याचबरोबर कोरोना बाधित  रुग्णांच्या मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. अशावेळी इच्छा असुनही जवळच्या नातेवाईकांना देखील अंत्यसंस्कार विधीसाठी हजर रहाता येत नाही. मात्र अशा बिकट परिस्थितीत ही स्मशानभूमीतील योद्धे आपल्या जिवाची व कुटुंबाची काळजी न करता  कोरोना बाधित मृतदेहांवर अहोरात्र मेहनत करीत  अंत्यसंस्कार विधी पुर्ण    करीत आहेत. 




अशा वेळी या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी  आयुक्त कादंबरी बलकवडे यानी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत लोक कल्याण सेवा मंडळाच्या वतीने 50  पीपीई किट आयुक्त सौ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे पंचगंगा स्मशान भूमीत  प्रदान करण्यात आले.यावेळी कादंबरी बलकवडे यांनी या    उपक्रमाचे कौतुक करत समाज सेवेसाठी सदैव पुढे यावे असे आवाहन केले. गेल्या कित्येक वर्षांपासून लोक कल्याण मंडळाच्यावतीने समाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.




या कार्यक्रमावेळी दिलीप गुंदेशा,जयेश ओसवाल, नगरसेवक ईश्वर परमार, प्रदीप राठोड, राजेश राठोड आदी सभासद हजर होते .






Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.