Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

मलाबार गोल्ड तर्फे 25 लाख रुपयांची एज्युकेशनल स्कॉलरशिप वितरित


Posted on :2/16/2022 4:39:07 PM


Livedinmaan.com
कोल्हापूर - भारतातील अग्रगण्य ज्वेलर्स मला भारत गोल्ड अँड डायमंडस् च्या कोल्हापूर शाखेच्यावतीने  आज कोल्हापुरातील नामवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनींना तब्बल 25 लाख रुपयांची एज्युकेशनल स्कॉलरशिप वितरित करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ स्मिता पाटील या उपस्थित होत्या.हा कार्यक्रम व्ही.टी.पाटील स्मृती भवन येथे पार पडला.

स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ स्मिता पाटील म्हणाल्या की शिक्षणानंतर आपण एक मुलगी आहोत याची जाणीव ठेवून समाजसेवेसाठी मुलींनी पुढे येणे गरजेचे आहे यावेळी कमला कॉलेजच्या डॉ. वर्षा महेंदरगी,महावीर महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र लोखंडे,तसेच  नेहरू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुचिता मंडलिक, मलाबबार गोल्डचे स्टोअर प्रमुख आबिद विटी,किशोर शेट्टी, जावेद महाबरी, हनीफ मोमीन उपस्थित होते.

कोल्हापूर शहरातील एकूण 4 महाविद्यालयाच्या 277 विद्यार्थिनींना एज्युकेशनल स्कॉलरशिप वितरित करण्यात आली.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.