Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

कोल्हापूर मधून साहस करेल सीमेवरील जवानांची दिवाळी गोड !!


Posted on :10/15/2022 5:31:36 PM


जवानांना मिठाई घेऊन जात असलेल्या पदाधिकाऱ्यांना निरोप देताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व इतर विश्वस्त
livedinmaan.com
कोल्हापूर - येथील साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाऊंडेशन (Sahas)आणि अनामप्रेम या संघटनांच्या वतीने राजस्थान येथील सीमेवर तैनात असलेल्या जवानांची दिवाळी मिठाईची 500 पाकिटे भेट देऊन जवानांची दिवाळी गोड केली जाणार आहे.यासाठी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते निरोप देऊन ही मिठाई राजस्थान कडे रवाना करण्यात आली.
   साहस या संस्थेचे विश्वस्त साताराम पाटील व कार्यकर्ते संतोष एकशिंगे हे स्वतः जोधपूर,राजस्थान येथील भारतीय सैन्य दलाच्या कार्यालयात जाऊन ही सुपूर्द करतील व तिथे तैनात असलेल्या आपल्या जवानांना वाटप करणार आहेत.
   भेटवस्तू पाठवण्याच्या या कार्यक्रमाला साहसचे विश्वस्त तेज घाटगे,अभिषेक मोहिते, अशकिन आजरेकर, साताराम पाटील व सीए कृष्णात पाटील हे उपस्थित होते.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.