livedinmaan.com
कसबा बावडा प्रतिनिधी - आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पोस्टाकडे सुपूर्त केलेल्या राख्या तत्परतेने बाय एअर सीमेवर पाठविण्यात येतील असे पोस्ट ऑफिसचे प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी आश्वाशित केले ते मुख्य पोस्ट ऑफिस येथे आझाद हिंद ट्रस्टच्या वतीने "राष्ट्र रक्षा बंधन" सीमेवरील जवानांच्यासाठी संकलित केलेल्या राख्या पोस्टाद्वारे पाठविण्याच्या कार्यक्रमात मुख्य पोस्ट ऑफिस येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कोल्हापूर शहर ,जिल्हा ,कोकण ,पुणे, पालघर या ठिकाणांहून संकलित केलेल्या एक लाखाहून अधिक राख्या पोस्टाद्वारे थेट सीमेवर पाठविण्यासाठी आल्या.
यावेळी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राहूल मगदूम म्हणाले, कसबा बावडा येथे कारगिल युद्धापासुन सुरू झालेला हा उपक्रम सर्वत्र साजरा केला जात आहे. विद्यार्थ्यांच्यात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी तसेच देशाच्या सीमेवर रात्रंदिवस जागृत असणाऱ्या जवानांची सदैव आठवण रहावी. सैनिकांना आम्हीही देशबांधव म्हणून कायम तुमच्या सोबत आहोत तुमची आठवण तुमचा त्यागाची जाणीव आम्हाला आहे. हा संदेश द्यावा म्हणून राष्ट्रिय भावनेने हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले. हा उपक्रम कोल्हापूर शहर, जिल्हासह कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग ,पुणे तळेगाव चाकण,पालघर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .
या कार्यक्रमास सुनील मुळे,प्रा.अतुल निगुरे,स्नेहल म्हेत्रे, मुख्यालयाच्या सहायक अधीक्षक निलोफर शेख, पोस्ट मास्तर सखाराम शेटवे,नीलकंठ मंडल,साहिल पाटील, शुभांगी पोरे, स्वप्नाली पाटील ,मानसी पोवार ,शुभंम पवार ,आशिष पाटील, पुष्पा उरूणकर,मौसमी बापट, रोहन पाटील आदीसह पाच महाराष्ट्र बटालियनचे विवेकानंद कॉलेजचे कॅडेट उपस्थित होते. कोकणात उपक्रम साजरा करण्यासाठी प्रा.संदीप वारके यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोस्टाद्वारे आझादी का अमृत महोत्सानिमित्त जय जवान म्हणून जवानाचे चित्र असणाऱ्या राख्या तयार करण्यात आलेल्या आहेत.त्या प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे अध्यक्ष राहूल मगदूम यांच्याकडे सुपूर्त केल्या.
राख्यावर विद्यार्थ्यांनी लिहले होते विविध संदेश
देशाच्या अमृत महोस्त्ववात सर्व राष्ट्र बांधवांनी सामील होऊन ज्यांनी देश स्वतंत्र केला त्यांची आठवण ठेवून त्यांच्या त्यागाला सलाम करावा.असे आवाहन केलेले संदेश त्यावर लिहले होते. त्याशिवाय क्रीडा क्षेत्रात उज्वल कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करणारेही संदेश लिहले होते.
Comment: