Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

3500 रुपयांची लाच स्विकारताना सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कनिष्ठ कर्मचारी सुद्धा रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील कारवाई


Posted on :3/28/2018 7:41:58 PM



कोल्हापूर प्रतिनिधी – कणेरी पैकी धनगरवाडा ता. पन्हाळा येथील तानाजी रामू पाटील यांच्या गट नंबर 534 मधील 4 गुंठे शेत जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या शासकीय फी व्यतिरिक्त 1500 रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांसह दुय्यम निबंधक यशवंत सदाशिव चव्हाण (54) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आज सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत अशा पद्धतीने एखाद्या सरकारी कार्यालयातील सर्वच्या सर्व कर्मचारी रंगेहाथ पकडले जाण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.




याबाबत अधिक माहिती अशी कि कणेरी पैकी धनगरवाडा ता. पन्हाळा येथील तानाजी रामू पाटील यांच्या गट नंबर 534 मधील 4 गुंठे शेत जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या शासकीय खर्चाची माहिती घेण्यास गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक चव्हाण सर्व माहिती दिली आणि शासकीय फी व्यतिरिक्त आणखी 1500 रुपयांची मागणी केली.आणि आपल्या कार्यालयातील महिला लिपिक गीता पांडुरंग बोटे,शिपाई प्रकाश यशवंत सणगर,कॉम्प्यूटर ऑपरेटर नितीन कोंडीबा काटकर,सुशांत दत्तात्रय वणीरे,आणि खाजगी उमेदवार शहाजी बळवंत पाटील यांना भेटण्यास सांगितले.




तक्रारदार या सर्वांना भेटले असता प्रत्येकी 500 रुपये द्यावे लागतील आणि कॉम्प्यूटर ऑपरेटर नितीन काटकर याने आपणास 1500 रुपये द्यावे लागतील असे सांगून एकूण 5000 रुपयांची मागणी केली.मात्र तडजोडीअंती आज 3500 रुपये घेऊन येण्यास सांगण्यात आले.त्यामुळे तक्रारदाराने कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.




त्या तक्रारीनुसार आज ही लाचेची रक्कम स्विकारताना पन्हाळा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील खाजगी उमेदवारासह सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,सहायक फौजदार शामसुंदर बुचडे,पोलीस नाईक शरद पोरे,संदीप पावलेकर,पो.कॉ.रुपेश माने यांच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.या सर्वांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.    







 




Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.