Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

बाबो !!! जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षक असलेल्या पोलीस नाईकानेच एक कोटींची लाच मागितली

सेवाभावी वर्दीला 'तिवडे'सारख्या प्रवृत्ती कलंकच


Posted on :8/6/2022 2:15:02 PM


livedinmaan.com
कोल्हापूर - कोल्हापूर पोलिसात नाईक पदावर असलेल्या जॉन वसंत तिवडे,बक्कल नंबर 959 नेमणूक पोलीस मुख्यालय,कोल्हापूर,रा.कोरोची,ता. हातकणंगले,जि.कोल्हापूर.याने तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे समोर आल्याने त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.पोलीस नाईक तिवडे अद्याप पोलिसांना सापडून आलेला नाही.विशेष म्हणजे तिवडे हा कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार  देहूगाव.ता हवेली,जि.पुणे येथील शेतीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण,पुणे खंडपीठ, पुणे येथील चालू दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी चक्क एक कोटी रुपयांची लाच कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या पोलीस नाईक जॉन तिवडे याने मागितली.

तक्रारदाराला दूरध्वनी द्वारे संपर्क साधून बोलावून तिवडे याने पोलीस युनिफॉर्म मध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली.तेथून अन्यत्र घेऊन जाऊन  तुमच्या विरोधी पक्षाने एक कोटींची ऑफर दिली असून,तुम्ही किती देता बोला ,केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो असे सांगितले.त्यामूळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.त्यानुसार काँ.तिवडे याने एसटी स्टँड परिसरातील हॉटेल सुब्राया येथे या लाचेची मागणी केल्याचे समोर आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत,पोलीस नाईक विकास माने, सुनील घोसाळकर, पो कॉ.मयूर देसाई, रुपेश माने व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आली.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिवडे यांच्यावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.आणि तिवडे याचा शोध सुरू आहे.



Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.